मी लिहायला लागलो वयाच्या १३ वर्षी , तेव्हा हे कविता, गाणी , जोक्स् किंवा सिनेमाच्या स्टो-या स्क्रिप्ट यातले शब्द काय माहित नव्हते. लिहायचय असत एवढ कळायचं .पण याची खरी सुरूवात झाली ती आमच्या वर्गशिक्षिका स्वाती माने मॅडम यांच्यामुळे, त्यांनी सर्वांना वाचनालयातील पुस्तके वाचा हा सल्ला दिला. मग काय वर्गातील एक -एक दर शनिवारी कोडोली (सातारा) गावच्सा वाचनालयाकडे वळू लागला. यात मीपण होतो, तेव्हा मी खुपच भयंकर पुस्तक घेतले होते, त्या पुस्तकाचे नाव होते "नक्षलवादाचे आव्हान." महिनाभर वाचत होतो, पुर्ण केले नाहीच कारण, माने मॅडमनी ते पुस्तक बघितल्यावर जाळच काढला माझ्यावर. कारण सर्वच जण कविता, विनोदाची, गोष्टीची पुस्तके आणत मीच मात्र कसा असा..? माहित नाही...
मला मिळेल ते वाचायचो, शनिवारची बालमित्र हि पुरवणी आवर्जून वाचायचो. आमच्याकडे देवाची पुस्तके, मासिके, ग्रंथवैगेर सगळे काही वाचून काढले, यामुळे मी मनाचे काहीपण तयार करण्यात माहिर होतो. माझ्या मराठीच्या सौ.बर्गे (चिंचनेर वंदन) यांना हे माझे गुण दिसलं की त्यांनी आमच्या वर्गशिक्षिका सौ माने यांना हे बोलुन दाखवल .इथून मागे फक्त वाचन होतं आता त्यांनी लिखानावर भर दिला. त्या दिवशी शुक्रवार होता, आणि गंमत म्हणजे माझ्या बाबतीत चांगले होत ते शुक्रवारी. त्या दिवशीपण हेच झाल त्यांनी सगळ्यांना कविता लिहुन आणायला सांगितली.तसे खुप जण अजूनही वाचानालयात जावून पुस्तके वाचत होती, त्यामुळे स्वत:चही काहीतरी तयार करा, असं त्यांचा उद्देश असावा. पण अचानक हा दणका तो पण सांगितलेल्या विषयावर काही जमणार नव्हते पण नाही केल तर मग इतके दिवस वाचनालयात जावून उपयोगच काय...? म्हणून निसर्गावर कविता केली, कारण चित्रकलेच्य विषयात पण निसर्ग आवडायचा म्हणून. वहितले जुळे फाडले आणि एका पाठोपाठ एक शब्दांनी ओळ धरली कागद भरु लागला माझ्या शब्दांनी.
तेव्हा लिहलेली कविता, पहिली कविता असल्यामुळे खुप जपुन ठेवली होती तीन वर्षे, आज ब्लाॅगवरही पहिली पोस्ट आणि पहिली कविता...!!
पाणी करुन मरेल माणुस जाती,
सवय याची खाती-पिती
आळशी नि ऐशारामी
आखिर होईल माती.
वागणं झालय हरामी
सायन्सला देतो सलामी
निसर्गाशी खेळतो कराटी.
एकदा झाली ना वाळकी वाटी
उपयोगी नाही पैशाची थापी
कवडीमोल ही माफी
बेभान उधळलेल्या क्षिताजासमोर.
-रजनी
(माझ्यासाठी तुमचे मत मोलाचं आहे)

Ek number Rajini
ReplyDeleteGood
ReplyDelete