मी इद्रा

                         
                        Rajini Harne

                          
         माझी दहावी झाल्यानंतर  मी सातारमधे एका मित्राच्या पावाच्या गाडीवर काम करु लागलो. तो हाॅटेल, वडापावचे हातगाडे व दुकानांमधे बेकरी माल पुरवण्याचे काम करायचा. दहावीनंतर माझ्याकडे खुप मोकळा होता आणि तेव्हा मी दुपारच्या MC-CIT क्लासला जायचो. सकाळी गणेशदादाबरोबर म्हणजे या मित्राच्या गाडीवर काम करायचो. सकाळी ६ वाजल्यापासुन १० वाजेपर्यंत पावाच्या गाडीवर  नंतर क्लासमधे......हेच माझं जुलैपर्यंतचे रुटीन होतं. तेव्हा हे दिग्ददर्शक थोरात साहेब किंवा त्याचे मित्र बोभाटे साहेब यापैकी कोणीच ओळखीचे नव्हते. बोभाटे साहेबांच्या एका मित्राने गणेशदादाला एक हॅण्डविल दिलं आणि  माझ्या हातामध्ये एका सिनेमाच्या म्हणजे इद्राचे ऑडीशनचे हॅण्डविल आलं, पण ते Actor लोकांसाठी उपयोगाचं होत आणि मी छोटासा   आणि कोणतीच ओळख नसलेला  लेखक & कवी  दहा-बारा दिवस ते तसेच ठेवले नंतर विचार केला मित्रांना सांगुयात ते जातीलचं की ऑडीशनला . माझ्या रुपेश नावाच्या  मित्राने ऑडीशन दिलं पहिल्या फेरीत select झाला आणि मी तसाच राहिलो पण डोक्यात विचार आला, मी कविता लिहुन देतो, बघुयात काय होतयं ते आणि माझी पहिली कविता सिनेमासाठी होती,मला फक्त बोभाटे साहेबांनी सिनेमाचा विषय सांगितला आणि पुढच्सा आठवड्यातच कविता त्च्यायांसमोर हजर केली. सगळे अवाकच् झाले कारण,मला चित्रपटची स्टोरीच माहित नव्हती तरीही एवढी चांगली कविता लिहली.........नंतर थोरात साहेबांनी पण पाठ थोपटली.  त्यानंतर मी अन्य मराठी / हिंदी/ इंग्रजी सिनेमांचे लेखकाशी संपर्क करुन त्यांच्यासाठी लिहु लागलो छोटे- छोटे Diolog पासुन नंतर scipt writing पर्यंत पोहचलो, इद्रा सिनेमामुळे माझ्या जीवनैत एक बदल घडवुव आणणारा  truring point आला, इद्रासाठी लिहण्याआधी पण मी लिखाण करायचो पण तेव्हा यातले काही माहिती नव्हते. मी मात्र फक्त लिहत गेलो.....लिहत गेलो.....!!! ज्यांच्यासाठी लिहित होतो, एवढं अति लिहत गेलो एक दिवशी कळालं हा अतिपणा डोक्यावर बसला....तेव्हा हे copyright काय असतं, मला  माहितच नव्हते. यातपण, काहिंनी मला हरभराच्या झाडावर चढवुन लिहुन घेतले होतं त्यांच्या पाठीमागे लागलो भिखा-यासारखा...... "बघा....सर काहितरी काम असेल तर." पण वेळ निघून गेली होती त्यांचे काम झालं होत.घर सोडल्यामुळे पैशाची गरज तर होतीच म्हणून फक्त ५०० रुपयासाठी जाहिरात लिखाण केली. नव्याने सुरूवात म्हणून मी एका बॉलीहुड shortfilm साठी लिखाण केलं पण इथे पण यात मला मोठा धोका एका उत्तर प्रदेशातील व्यक्तीने दिला आणि माझ्यातला लेखकाचा खुण झाल्याप्रमाणे झालं, मी माझ्यातला लेखकच मारुन टाकला. तेव्हापासुन मी लिहणं बंद केल ते बंदच......!!! आजही काही लोक  फोन करतात, " अरे, रजनी लिहणार का..?" पण नाही लिहुशी वाटतं.आणि यानंतर मी कधीच भारतीय चित्रपटभुमीमधे पायही ठेवणार...असो म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाय........अगदी तस्सं होणार माझं, मला माझाच भयंकर राग येतो.........मी किती इद्रा आहे ना..?
          या येत्या २८ सप्टेंबरला इद्रा चित्रपट येणार असल्याचे दिग्ददर्शक रमेश थोरात यांनी सांगितलयं, कविताही म्हंटलं तुमच्यापर्यंत पोहचावी यामुळे खास 
                           

"जरी मी असलो इद्रा" 

सरकार बनत चाललयं आमच सावकार,
आता किती सप्न दाखवाल, आधुनिक शेतीची
हाय ती तरी खुलवा, नाय तर
आवाज उठवीन बर का,
जरी मी असलो इद्रा.

बापण माझा यातचं फसला,
कर्ज काढुन गरीबीतच रुतला,
फिटना म्हणुन जीव दिला 
पण, शेवटपर्यंत रानासाठी राबला, 
म्हणून जमिन कसायचा घेतला मी वसा 
जरी मी असलो इद्रा.

कुणाची मला गरज नाय आन् खरंच 
स्वत:च्या जीवावर करुन दाखवीन,
ह्यो शिवार ना शिवार फुलवीन,
उभं पिक खुशीन नाचलं 
आन् धान्य कणगी -कणगी भरु
जरी मी असलो इद्रा.

मला आभाळाची छाया, काळ्या आईची माया,
सोबतीला गोठ्यातल्या लाडक्या बैलांची साथ,
किती आलं, गेलं, येतीलपण आमच्यासाठी 
तरीपण उद्या उद्याची नसे तमा मला 
जरी मी असलो इद्रा.

आररं.. कुठं शोधताय जगाता पोशिंदा,
गावच्या चावडीला की रानाच्या बांधाला.
त्यातले काही लटकले फासाला बाभूळ साक्षीला,
जित्तं हाईत त्यांचा या मदतीला
ही ईनंती करतोय आता 
जरी मी असलो इद्रा...

मग आवडली ना कविता ...??
मला माहितेय आवडली तर असणार कारण इद्रा चित्रपटातील सगळ्यांनी माझं कौतुक केलं होत, पण तुमचे शब्द माझ्यापर्यंत नक्की पोहचवा.
मी रजनी याची वाट पाहेन.....
                                   

                                     Rajini Harne                            



Comments

Post a Comment

Hey my dear Blog Reader, Thanks.! to read post. You are welcome always here.

This Blog is reserved with Rajini Harne 2020 in Indian Film_Writers_Association.
posts are registered in US_COPYRIGHT_Office, US.
So, Do not try to copy or make duplicate prints.

All Rights Reserved with
Copyright©2018-2020RajiniHarne

No copy because it is illegible.

Order by Rajini Harne.